पुणे: शशी सेवा संघटना व मोगरे मित्रमंडळ यांच्यातर्फे अॅथलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन वानवडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंच्या पुढील शिक्षणाची जबाबादारी संघटनेने घेतली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ मिळावे यासाठी या अॅथलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक फोरमचे अध्यक्ष निवृत कमांडर एस.अग्रवाल, लक्ष्मण सरोदे, श्रीमती सुजाता गायकवाड, निवृत्त कर्नल एल.एस.शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये परिसरातील अठराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पन्नास मिटर, शंभर मिटर धावणे, बिस्किट खाणे, रिले, सायकल चालविणे, संगीत खुर्ची यासारख्या व इतर अनेक नाविन्यपुर्ण स्पर्धांचा सहभाग करण्यात आला होता.
स्पर्धेतील विजेते खेळाडूंचा सत्कार नगरसेविका डॉ.किरण मंत्री, नगरसेवक किरण गरमकर व माजी नगरसेवक मनिष साळुंके यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विवेक शिंदे, विनोद मोगरे, तात्या शेंडकर, सलिम बागवान, सचिन मथुरावाला, अजय शिंदे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या खेळांडूंना शालेय वस्तुंचे वाटप, महिलांना गृहपोयोगी वस्तु बक्षिस म्हणुन देण्यात आल्या. विद्यार्थी, नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी या स्पर्धेस उत्साहाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे संयोजन भाजप युवा मोर्चाचे उपशहराध्यक्ष अॅड. राहुल बोराडे यांनी केले होते.



