पंकजा मुंडे म्हणाल्या , मुख्यमंत्र्यांनी दर करासासाठी ही ई टेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिलेत, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाली आहे, शिवाय, काँग्रेस सरकारच्या काळात निश्चित झालेल्या दरानुसारच ही खरेदी झाली, माझ्यावर झालेला २०६ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे… हा केवळ शब्दांचा घोटाळा आहे ,घोटाळा शब्द वापरुन खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला… हे सारे राजकीय आरोप माझ्या प्रतिमेला मलिन करण्यासाठी केले गेलेत एकाही पैशाचा अपहार झालेला नाही… माझ्यावर केल्या गेलेल्या सगळ्या आरोपांचा मी खंडन करतेय.करासासाठीही ईटेंडरिंग करण्याचे आदेश एप्रिलमध्ये दिलेत, माझ्या खात्यातील खरेदी ही फेब्रुवारी, मार्चमध्ये झाली: ज्या विभागात दरकरार निश्चित आहेत त्यासाठी ई टेंडरिंगची गरज नसते, नवीन करारासाठी ई टेंडरिंग करावे लागते काँग्रेस काळातल्या दरानुसार खरेदी केली… हे करार दर अगोदरपासूनच निश्चित होते मंत्री होण्यापूर्वी महिला व बालकल्याण खात्यात ४०८ कोटींची खरेदी झाली, मी २०६ कोटींची खरेदी हा घोटाळा म्हणणे अयोग्य आहे . काही लोकांना झुकतं माप दिल्याचा आरोपही खोटा आहे… राज्यात एकच दर करार असल्याने त्याच व्यक्तीला कंत्राट, काँग्रेसच्या काळातही याच व्यक्तीला कंत्राट दिलं गेलं होतं… मग, मी केलेल्या खरेदीला स्कॅम कसं म्हणायचं? रेट कॉन्ट्रॅक्टबाबत कुणालाही मागे घातलेलं नाही.मी खरेदीप्रक्रियेत कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही… मुख्यमंत्र्यांचे आदेश डावललेले नाहीत.माझ्या खात्याला मिळालेला पैसा वाया जाऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला . मी भारतात नाही हे पाहून मगच आरोप करण्यात आले.परदेशातूनही मीडियाशी संपर्क कायम ठेवला.. मुख्य सचिवांद्वारे मुख्यमंत्र्यांकडेही स्पष्टीकरण दिलंय.चिक्कीची तपासणी लॅबमध्ये करण्यात आलीय… अहमदाबाद आणि नाशिकमधील प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे… चटईंची खरेदीही आधीच्याच दराने झालीय… तरीही कुठल्याही चौकशीसाठी मी तयार खरेदीची माहिती दडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. आरोप सिद्ध असल्यास मी पदाचा राजीनामा देईन असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले
वाट्टेल त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार… पंकजा मुंडे
मुंबई – खरेदीच २०६ कोटीची -२०६ कोटीचा घोटाळा कसा म्हणता ? मी एक पैशाचाही अपहार केलेला नाही तरीही वाट्टेल त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे आज महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले
राज्यातील आदिवासी भागातील मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून वाटण्यात येणा-या चिक्की व इतर काही साहित्य खरेदीच्या 206 कोटींच्या कंत्राटात पंकजा मुंडेंनी नियम धाब्यावर बसविले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. विरोधकांनी यावरून रान पेटवले. पंकजा मुंडे युरोपात फिरायला गेल्या असताना हा आरोप करण्यात आला. मागील आठ दिवस हे प्रकरण राज्यात, देशात चर्चेले जात आहे.
मंगळवारी पहाटे पंकजा लंडनहून मुंबईत परतल्या. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्यासमवेत महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, बहिण खासदार प्रीतम मुंडे व रासपचे आमदार महादेव जानकर एवढेच उपस्थित होते.