पुणे : वाघोली येथे महावितरणकडून नवीन 22/22 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येत असून त्यामुळे वाघोली
व परिसरातील 25 हजार वीजग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळणार आहे. तसेच पर्यायी
वीजपुरवठ्याची यंत्रणाही उभारण्यात येत आहे.
वाघोली गाव व परिसराचा सद्यस्थितीत वेगाने विस्तारीकरण होत असल्याने वीजग्राहक व विजेच्या मागणीत
वाढ होत आहे. त्यासाठी महावितरणकडून पायाभूत आराखडा विकास कार्यक्रमातून वाघोली येथे 22/22 केव्ही पूर्वरंग उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचे काम सुरु झाले आहे. या उपकेंद्र तून निघणार्या तीन वाहिन्यांद्वारे वाघोली व परिसराला सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे. पूर्वरंग 22 केव्ही उपकेंन्द्रा ला 400/220/22 केव्ही लोणीकंद उपकेंद्रा तून डबल सर्कीट वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ही वाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले
याशिवाय लोणीकंद उपकेंद्रा तून आणखी एक 22 केव्ही क्षमतेची भूमिगत वाहिनी टाकण्यात येत असून त्याद्वारेही
वाघोली व परिसराला वीजपुरवठा होणार आहे. तसेच खराडी उपकेंद्रा तून भूमिगत वाहिनीद्वारे पूर्वरंग उपकेंद्रा ला
भूमिगत वाहिनी जोडण्यात येणार आहे. यामुळे वाघोली व परिसरातील लोणीकंद येथून वीजपुरवठा खंडित झाल्यास खराडी उपकेंद्रा तून या भूमिगत वाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे.
वाघोली व परिसरासाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्चाच्या वीजयंत्रणेची उभारणी सुरु आहे. येत्या सहा महिन्यात वीजयंत्रणेचे कामे पूर्णत्वास जाणार असून त्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.