पुणे, दि. 30 : वाकड येथे वीजमीटरमध्ये फेरफार करून 40 हजार 500 युनिटस्च्या 8 लाख 56 हजार 160
रुपयांची वीजचोरी झाल्याप्रकरणी रास्तापेठ येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की सांगवी उपविभाग अंतर्गत वाकड येथील महावितरणचे वाणिज्यिक
वीजग्राहक अनिल सुदाम भूमकर यांचे नावे असलेल्या वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे
नियमित तपासणीत निदर्शनात आले. या ठिकाणी तब्बल 40 हजार 500 युनिटस्च्या 8 लाख 56 हजार 160
रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. या चोरीच्या विजेचा वापर हॉटेल सिल्व्हर स्पूनसाठी करण्यात येत
असल्याचे दिसून आले. वीजचोरीचा पंचनामा करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल
सुदाम भूमकर याचेविरुद्ध शनिवारी (दि. 26) रास्तापेठ महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा
कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


