पुणे :
“ऍलर्ट’ (असोसिएशन फॉर लिडरशीप एज्युकेशन रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग) या पर्यावरण जागृतीसाठी कार्यरत संस्थेतर्फे “होम’ हा पर्यावरणविषयक माहितीपट दाखविण्यात आला. एरियल फोटोग्राफीद्वारे पृथ्वीची विलोभनीय रूपे, वैविध्य आणि मानवजातीकडून पर्यावरणाला असलेला धोका याचे चित्रण या माहितीपटात होते.
“इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व’ केंद्र येथे “वसुंधरा दिना’निमित्त हा माहितीपट दाखविण्यात आला. ऍलर्टच्या संस्थापक, खासदार ऍड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या.
पृथ्वी आणि पर्यावरण वाचविण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. नीला विद्वांस, रवी चौधरी, ऍड. नानासाहेब साळुंखे, अशोक राठी, मनाली भिलारे, शशिकला कुंभार, सौ. मृणालिनी वाणी हे उपस्थित होते.


