पुणे- ज्येष्ठ पत्रकार व पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे शहरसंघटक नंदकुमार सातुर्डेकर यांच्या पत्नी वर्षा नंदकुमार सातुर्डेकर (वय- 47, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) यांचे आज सकाळी हॄदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या आणि पती असा परिवार आहे.
पिंपरीगाव येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे सातुर्डेकर यांच्या पत्रकार मित्र परिवारात व शिवसैनिकांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
उद्या सकाळी नऊ वाजता पिंपरीगावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.