Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वडगाव- धायरी पुलावर भीषण अपघात- ६ ठार

Date:

पुणे-कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर वडगाव पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव डंपरने लक्‍झरी बस, दुचाकी आणि चारचाकींसह दहा वाहनांना धडक दिल्यामुळे सहा जण ठार, तर दहा जण जखमी झाले. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे.

रवींद्र तुकाराम सावंत (वय 35), त्यांची पत्नी सारिका सावंत (वय 30), मुलगी रेवती सावंत (वय 10, सर्व जण रा. मुंबई, मूळ रा. सांगवी-कुडाळ, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (वय 29, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी रामसिंग राठोड (वय 25, रा. धायरी, मूळ रा. पिंगळी, ता. हदगाव, जि. नांदेड) आणि महेबर यादव गायकवाड (वय 23, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये रचना रवींद्र सावंत (वय 14), भालचंद्र विठ्ठल कालूरकर (वय 42), मयाप्पा पांडुरंग कोळेकर (वय 42), रूपेश राजेंद्र पळसदेवकर (वय 34, तिघे रा. धनकवडी), बाळासाहेब विठ्ठल घाडगे (वय 56, रा. कोंढवा), शरद सर्जेराव मोरे (वय 54, रा. सातारा), रवी अंकुश वाघमारे (वय 22, रा. आंबेगाव पठार), नीलेश शिवलाल पवार (वय 23), रमेश हरी जाधव (वय 25) आणि स्वप्नील सुरेश जोशी (वय 45, तिघे रा. वारजे) यांचा समावेश आहे. जखमींवर नवले, मंगेशकर आणि जगताप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हरीश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र सावंत हे त्यांच्या मेव्हणीच्या लग्नासाठी कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते सॅण्ट्रो कारमधून मुंबईला परत जात होते. त्यांच्यासमवेत मित्र सुभाष चौधरी हे होते. सावंत यांचा मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचा व्यवसाय आहे, तर राठोड हा बिगारी कामगार असून, तो कामावर पायी जात होता.
महामार्गावर वडगाव बुद्रुक पुलाजवळ पीएमपी बसचा थांबा आहे. तेथून पुढे काही अंतरावर एक महिला मोबाईलवर बोलत जात होती. तिला वाचविण्यासाठी बसचालकाने बस अचानक उजव्या बाजूस घेतली. त्या वेळी वारज्याच्या दिशेने जाणाऱ्या खडी आणि डांबराचे मिश्रण भरलेल्या डंपरने प्रथम लक्‍झरी बसला धडक दिली. त्यामुळे बस झाडावर जाऊन आदळली. त्या बसने मॅक्‍स जीपला धडक दिली. तसेच, डंपरने पुढे जाऊन तवेरा आणि सहाआसनी रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तीन दुचाकींना धडक दिल्यामुळे त्या डाव्या कठड्याच्या बाजूस पडल्या. तेथून पुढे डंपरने स्विफ्ट डिझायर, सॅण्ट्रो आणि ओम्नी व्हॅनला धडक दिली. त्यानंतर सॅण्ट्रो, डंपर आणि ओम्नी व्हॅन पुलाचा कठडा तोडून खाली पडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जवानांनी कटरच्या साहाय्याने सॅण्ट्रो कारचा पत्रा कापून चार मृतदेह बाहेर काढले. त्याच कारमध्ये जखमी असलेल्या रचना सावंत हिला बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. यामुळे कात्रजच्या पुढे काही अंतरापासून वारज्यापर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
प्रत्यक्षदर्शी संदीप भंडारी हे हिंगणे खुर्द येथून वारज्याकडे जात होते. ते म्हणाले, “”मी पुलावर जात असताना पाठीमागे मोठा आवाज झाल्यामुळे वळून पाहिले. डंपर काही वाहनांना धडकत येत होता, म्हणून मी माझी गाडी उभी करून दूर पळालो. काही वेळातच त्या डंपरने माझ्या व्हॅनलाही उडविले. मी गाडी सोडून पळालो म्हणून वाचलो.‘‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...