एड .वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून येरवडा तुरुंगास महिला कैद्यांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली . रुग्णवाहिका सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज दि . १६ एप्रिल रोजी सकाळी झाला . तुरुंगातून महिला कैद्यांना रुग्णालयात हलविण्याची आधीची व्यवस्था असुरक्षित होती . या रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक सुसज्य यंत्रणा आहे . महिला कैद्यांच्या प्रसूती काळात होणारी गैरसोय या रुग्णवाहिका मुळे टाळता येणार आहे . खा वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने या रुग्णवाहिकेसाठी निधी देण्यात आला आहे .
यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या , महिला कैद्यांना उपचारासाठी, तपासणीसाठी आणि सुरक्षिततेसाठी त्वरित रुग्णालयात नेता यावे यासाठी हि रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल . या साठी खासदार निधीतून ९. ५० लाख रुपये निधी देण्यात आला आहे . ‘
यावेळी कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई , नगरसेवक अनिल टिंगरे , नगरसेवक मीनल सरवदे , एड म. वि . अकोलकर , मंगेश गोळे , रवी चौधरी , मिलिंद बालवडकर , दत्तात्रय गायकवाड , एड औदुंबर खुने -पाटील , इक्बाल शेख, मनाली भिलारे, रजनी पाचंगे , सुनीता मोरे , बबलू जाधव आदि उपस्थित होते
यावेळी बोलताना कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई म्हणाले , ‘ खा वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेसाठी आम्ही आभारी आहोत . तुरुंगामध्ये कैद्यांचे नातेवाईक भेटायला आल्यावर त्यांना तासंतास ताटकळत रस्त्यावर बसावे लागते , यावेळी अपघाताची शक्यता असते . त्यांच्यासाठी अभ्यागत कक्ष (Wetting Room ) शेड करावी अशी विनंती आम्ही वंदना चव्हाण यांना करीत आहोत . या विनंतीस खा वंदना चव्हाण यांनी मान्यता दिली आहे .