मकरसंक्रांतनिमित पंजाबी बांधवांनी लोहरी सण उत्साहात साजरा करण्यात आला . बोपोडी येथील गुरुद्वारा सभा येथे पंजाबी बांधवानी रेवडी , गुडदाणी , लाह्या , गुळ टाकून शेकोटी सरसोचे तेल टाकून पेटविण्यात आली . यावेळी उसाचा रस देऊन खिचडी गुळ , खीर देण्यात आली यावेळी ग्यानी सरदार गुरुविंदरसिंग , आकाशदीप सिंग कीर्तनाचा कार्यक्रम झाला .त्यानंतर गुरूची महिमा सांगण्यात आली . यावेळी खडकी मधील गुरुद्वारा श्री. गुरुसिंग सभाचे माजी अध्यक्ष रवींद्रसिंग सेठी , माजी सचिव गुरुशरणसिंग सहानी , बलंविंदरसिंग राणा , परविंदरसिंग बावरा , भूपिंदरसिंग कौर , गुरुसिमसिंग कौर मनमीतकौर बावरा आदी मान्यवर व शीख धर्मीय सहभागी झाले होते . एकमेकामध्ये मिठाई वाटण्यात आली . यावेळी शेकोटीच्या भोवती पंजाब मधील प्रसिद्ध भांगडा नृत्य करण्यात आले . यावेळी शीख बांधवांनी एकमेकांना लोहरीच्या शुभेछा दिल्या . हा सण पंजाब , हरियाणा मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो . पंजाबी समाजात सर्वात लोकप्रिय हा उत्सव समजला जातो . या शेकोटी भोवती सर्व जण शेकोटीचा आनंद लुटला .