सजग नागरिक मंचाकडून नागरिकांच्या हेलपाट्यांचे सर्वेक्षण
पुणे :
महिन्याच्या पहिल्या सोमवार ऐवजी आज मंगळवारी झालेल्या लोकशाही दिनाला नागरिकांनी गर्दी केल्याने खुर्च्या अपुऱ्या पडल्या !
विवेक वेलणकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जमिनीवर बसकण मारली .. यावेळी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर ,विश्वास सहस्त्रबुद्धे ,वृक्ष प्रेमी नंदकुमार गोसावी ,’ सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह ‘ चे दीपक बिडकर उपस्थित होते , थोड्या वेळाने खुर्च्या आल्या
सजग नागरिक मंचाने यावेळी सतत लोकशाही दिनाला येवूनही प्रश्न न सुटलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून माहिती गोळा केली . त्यात अनेक नागरिक सातत्याने १०-११ वेळा चकरा मारूनही प्रश्न सुटत नसल्याचे लक्षात आले . तसेच वैकुंठभाई मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेतील संभाव्य रस्ता रुंदीकरणा च्या आणि वृक्ष तोडीच्या विरोधात नागरिकांनी आजच्या लोकशाही दिनी आक्षेप नोंदविला