पुणे :
दहावीत चमकदार कामगिरी करणाऱ्या “सुपर अचिव्हर्सना’ आणखी प्रेरणा देण्यासाठी “लाईफ स्कुल फाऊंडेशन’ (कोेरेगांव पार्क) तर्फे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी 40 विद्यार्थ्यांना 10 “मर्सिडीज् ‘ गाड्यांमधून पुणे-लोणावळा सफर घडविण्यात आली. “लाईफ स्कूल’चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ (पुढे चलूया अभियान) अंतर्गत हा उपक्रम आखण्यात आला होता.
भारतभरातील दहावीतील हजारो विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये जाऊन 7 उपयुक्त सत्रांमधून मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते. यात सरकारी तसेच खासगी शाळांचाही समावेश होता. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ उपक्रमांतर्गत पुण्यातील 16 शाळांमधून विद्यार्थ्यांना निवडण्यात आले.
यामध्ये कमलनयन बजाज स्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल, बदरियॉं हायस्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. मराठी माध्यम स्कूल, सरनोबत गजानन थोपटे स्कूल, एस.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल, सीएमएस इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, जयहिंद हायस्कूल, मोलेदिना हायस्कूल, एस.एम.चोकसे हायस्कूल, सिंहगड स्प्रिंग डेल तसेच महानगरपालिकेच्या मौलाना मोहमद अली जौहर उर्दू माध्यमिक विद्यानिकेतन (गणेश पेठ), वसंतदादा पाटील विद्यालय (बाजीराव रोड) या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
दहावी इयत्तेत 90 % च्या वर गुण मिळविलेल्या या 30 “सुपर अचिव्हर’ विद्यार्थ्यांना “स्टार ऑफ फ्युचर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांसाठी पुणे-लोणावळा सफर मर्सिडीज् बेंझ गाड्यांमधून करण्याची संस्मरणीय भेट मिळाली. या विद्यार्थ्यांना त्यंाच्या घरून “मर्सिडीज् बेंझ’ गाड्यामधून आणण्यात आले. “मर्सिडीज् बेंझ’ कंपनीने या उपक्रमासाठी 18 गाड्या दिल्या होत्या.
हे विद्यार्थी लोणावळा सफर करत असतानाच पालकांशी नरेंद्र गोयदानी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पुढील 10 वर्षाच्या मेंटॉरिंग प्रोग्राम अंतर्गत तज्ज्ञ प्रशिक्षणाद्वारे सतत मार्गदर्शन करण्याची योजना आहे. “लाईफ स्कुल’ अभिनव उपक्रमांद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या संधींचा प्रकाश आणण्यासाठी कार्यरत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
“लाईफ स्कूल’चे 200 कार्यकर्ते भारतभरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ या उपक्रमाद्वारे शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. त्याआधारे शिक्षकांनादेखील प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्म विचार निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमातंर्गत भारतातील 15 शहरांतील 25,000 शिक्षक आणि लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात “लाईफ स्कूल’ला यश आले आहे, अशी माहिती संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला लाइफ स्कूल चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, चंद्रा वर्धन भंडारी, देवेन भंडारी, अमित भंडारी, राज मुछाल हे उपस्थित होते.
“लाईफ स्कूल फाऊंडेशन’तर्फे “सुपर अचिव्हर्स’ विद्यार्थ्यांनी “मर्सिडिझ’ मधून केली लोणावळा सैर!
Date: