पुणे लष्कर भागातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ( सेंटर स्ट्रीट) वरील प्रसिध्द सराफ पेढी चुनीलाल लाधाजी अन्ड सन्स ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास दुकान बंद करण्याच्या वेळेस तीन महिलांना चोरी करताना या पेढीतील कर्मचाऱ्यानी रंगेहाथ पकडले .
रात्री पावणेनऊ वाजता दुकान बंद करण्याच्या सुमारास या तीन महिलांनी दुकानात धार्मिक कामासाठी सोने खरेदी करायचे आहे , त्यासाठी आम्हाला सोने खरेदी करू द्या , अशी विनंती या पेढीतील कर्मचाऱ्याकडे केली , परंतु पेढी बंद झालेली आहे , उद्या खरेदीला या असे पेढीतील कर्मचाऱ्यानि या महिलांना सांगितले , परंतु या महिलांनी आमच्या येथे उद्याच धार्मिक कार्यक्रम आहे असे सांगून खूपच विनंती कर्मचाऱ्याकडे केली . त्यावेळी कर्मचाऱ्यानी त्यांना सोने दाखविण्यास सांगितले , त्याच वेळी त्या महिलांनी पाणी पिण्यास देण्याची विनंती केली , अशा प्रकारे या पेढीतील कर्मचाऱ्यांना कामामध्ये गुंतवून ठेवले . त्यामध्ये एका महिलेने पेढीतील काऊन्टर मध्ये हात घालून सोन्याचे ट्रे चोरण्यास सुरुवात केली , परंतु हि चोरी करत असताना ट्रे मधील सोन्याचा एक दाबा खाली पडताना आवाज झाला , तो आवाज पेढीतील कर्मचाऱ्यांनी ऐकले असता सोन्याचा डबी खाली पडल्याचे त्यांना आढळले ,त्यावेळी या महिला सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या नसून त्या सोने चोरण्यासाठी आलेल्या आहेत हे लक्षात आले , त्यामध्ये या कर्मचाऱ्यानी आरडाओरड करून दुकानाचे शटर लावण्यास सांगितले , परंतु तेवढ्या वेळात एका महिलेने एक सोन्याची डबी चोरून जोरात धाव घेवून पळून गेली , या तिघीमध्ये दोन महिलांना कर्मचाऱ्यानी पकडले , अशी सर्व माहिती या पेढीतील कर्मचारी रामचंद्र पांडे आणि बहाद्दूर सिंग यांनी दिली .
पुणे लष्कर भागातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ( सेंटर स्ट्रीट) वरील प्रसिध्द सराफ पेढी चुनीलाल लाधाजी अन्ड सन्स ज्वेलर्स हि पेढी खूप वर्षापासूनची जुनी पेढी आहे , या महिलांना लष्कर पोलिस ठाण्याच्या अंकित चारबावडी पोलिस ठाणे मध्ये रात्री उशिरा या गुण्याचे तपासाचे काम चालू होते .
या महिलांची चोरी करतानाचे फुटेज पेढीतील सी सी टी व्ही रेकॉर्डिंग झाले आहे , त्यामुळे या महिला चोरी करताना स्पष्ट दिसत आहेत . अशी माहिती चुनीलाल लाधाजी अन्ड सन्स ज्वेलर्सचे मनोज छाजेड यांनी दिली . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट शांतता समितीच्या महिला सदस्या बेबी साळवे , पुणे कॅम्प ज्वेलर्स ग्रुपचे पदाधिकारी उमेश सिंघवी , गिरीश शहा , भरत सोळंकी , सागर शहा उपस्थित होते .