पुणे लष्कर भागातील घोरपडी भागातील लष्कराने बंद केलेले रस्ते आजपासून खुले करण्यात आले . घोरपडी बाजारातील हमारा उद्यानपासून सोलापूर रोडला जोडणारे अलेक्झांडर रोड ( अरुण खेत्रपाल मार्ग ) या रस्त्यावरील लष्कराने लावलेले लोखंडी अडथळे हटविण्यात आले .
केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांना पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवेदन देण्यात आले होते . त्या निवेदनातून मनोहर परिकर यांनी केंद्राच्या रक्षा मंत्रालयातून बंद केलेले रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले . पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी हा रस्ता खुला केला . हा रस्ता खुला केल्यामुळे , सकाळी व्यायामास जाणारे नागरिक , विद्यार्थी , नोकरीसाठी जाणारे नागरिक , तसेच घोरपडी मधील रहिवाश्यांनी आनंद व्यक्त केला .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या घोरपडी भागातील नगरसेविका डॉ. किरण तुषार मंत्री यांनी सांगितले कि , रस्ते खुले केल्यामुळे नागरिकांना जाणे येणे सोपे झाले आहे , अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जनतेला दिलेले आश्वाशन पूर्ण होत आहे . त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांचे आभार मानले . तसेच पुढील रस्ते हि लवकरात खुले करण्यात येतील . त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत मंत्री , घोरपडी गावचे माजी सरपंच मारुती गणेशकर , अजय पाटोळे , दीप्ती पाटोळे , उमेश सोनावणे , अरविंद पिल्ले , किशोर त्रावडन , उदय घिया , अनिल पिल्ले , राजेंद्र काळे , अस्लम खान , विजय गरसुंद , कांती आगरवाल , नितीन लोखंडे , महेश ढवळे आदी उपस्थित होते .