रॉयल एन्फिल्डच्या फातिमानगरयेथील फन न शॉपमधील प्लेटीनम ऑटोमध्ये ” हिमालयन ” या नव्या मोटारसायकल सादर करण्यात आले . रॉयल एन्फिल्ड या जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या या मोटारसायकल ब्रांडतर्फे आज ” हिमालयन ” हि खास मोटारसायकल सादर करण्यात आली . यावेळी प्लेटीनम ऑटोचे संचालक जिगर गवळी , निवृत्ती गवळी , सोपान गवळी , जगन्नाथ खोपकर , अनिल गवळी , शिला गवळी , प्लेटीनम ऑटोचे व्यवस्थापक सारंग केंजळे आणि रॉयल एन्फिल्डचे प्रतिनिधी उपस्थित होते .
हिमालयन हि हिमालयातील साहसी सफरीना बळकटी देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे . तब्बल ६० वर्षाचा हिमालय प्रांतातील सफरीचा अनुभव एकत्रित करून बनविलेले , अतिशय नेटके व कणखर आरेखन आणि त्याला नव्या एलएस ४१० इंजिनच्या शक्तिचा पाठिंबा असलेली द रॉयल एन्फिल्ड हिमालयनमुळे भारतातील साहसी सफरीच्या एका अतिशय शुध्द पराकोटीच्या आणि अधिक सुलभ अनुभूतीसाठीचा मार्ग खुला होणार आहे . वास्तविक पाहता , या मोटार सायकलची जबरदस्त ऑफ रोड क्षमता चालकाला एखाद्या दुष्कर पर्वतरंगांच्या रस्त्याप्रमाणेच खड्डयानी भरलेल्या शहरी जंगलातील रस्त्यावर उत्तम सफरीची अनुभूती देणारी आहे , अशी माहिती प्लेटीनम ऑटोचे व्यवस्थापक सारंग केंजळे यांनी दिली .

