रेड एफ.एम च्या जाहिरातीबाबत भाजपचे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे पहा नेमकी काय तक्रार केली आहे … प्रत्यक्षात पहा काय तक्रार आहे ते
प्रती,
मा.कुणाल कुमार,
आयुक्त पुणे मनपा.
विषय- रेड एफ.एम ची बेकायदा व अश्लील- फ्लेक्स व जाहिरातीबाबत…
मा.महोदय,
पुण्याच्या विविध चौकात व सिग्नल वर रेड एफ.एम ची जाहिरात (फ्लेक्स) झळकत आहे.सदर फ्लेक्स वर पुणे मनपा व पुणे पोलिसांचे बोधचिनह असुन या फ्लेक्स वर Dont be Horny-Horn nahin Red fm bajao असा मजकुर आहे.
या फ्लेक्स बाबत आकाशचिनह विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांच्याशी संपर्क साधला असता “या फ्लेक्स ला मनपा ने कोणतीही परवानगी दिलेली नाही,सदर फ्लेक्स बेकायदा लावण्यात आले असुन त्याचे कुठलेही शुल्क भरण्यात आलेले नाही” असे त्यानी स्पष्ट केले.
सदर फ्लेक्स वरील वाक्य Dont be horny हे अश्लीलतेकडे झुकणारे असुन त्याचा डिकशनरीतील अर्थ (Sexually excited,+easily aroused sexually ) असा आहे.पुण्या सारख्या सुसंस्क्रुत शहरात अश्या आशयाचे फ्लेक्स लागणे,त्यावर मनपा चे बोध चिनह असणे,त्याची परवानगी न घेणे,शुल्क न भरणे,हे मनपा च्या अकार्यक्षम कारभाराचे प्रतीक असुन,याविरुद्ध त्वरित कारवाई करावी व सदर वाहिनी कडुन दंडासह शुल्क रक्कम वसूल करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष क्रीएटिव्ह फाउंडेशन.
मो.9850999995
9823052596,