पुणे :
‘ फुलेवादावर राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती झाली असून सामाजिक न्याय आणि समतेचा विचार तळागाळात आम्ही नेत आहोत , ९३ हजार बूथ पर्यंत रासप च्या महिला कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाइल आणि याच फुलेवादी विचाराला महिला शक्तीचा पाठींबा मिळून पंधरा वर्षात राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मुख्यमंत्री सत्तेवर येईल. ‘ असा जोरदार आशावाद आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केला
जागतिक महिला दिनानिमित्त ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या वतीने ‘राज्यव्यापी महिला मेळाव्या’चे आयोजन अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते . संयोजन पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख डॉ. उज्ज्वला हाके यांनी केले .कामगार नेत्या मुक्ता मनोहर, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ . माधवी वैद्य ,भंगार मालाच्या विक्रीतून मंदिर उभारणाऱ्या बाळूमावशी धुमाळ , मनसे नगरसेवक युगंधरा चाकणकर ,कराड पालिकेतील विरोधी नेत्या स्मिता हुलवान आदी महिलांचा सत्कार करण्यात आला .
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .
आमदार महादेव जानकर म्हणाले ,’ राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे महिला आघाडीचे विभागीय मेळावे राज्यात घेतले जाणार असून महिलांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे काम केले जाणार आहे . सर्व सत्तास्थानामध्ये महिलांचा प्रवेश व्हावा अशी पक्षाची भूमिका राहणार आहे .फुलेवादावर राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती झाली असून सामाजिक न्याय आणि समतेचा विचार तळागाळात आम्ही नेत आहोत , ९३ हजार बूथ पर्यंत रासप च्या महिला कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाइल आणि याच फुलेवादी विचाराला महिला शक्तीचा पाठींबा मिळून पंधरा वर्षात राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा मुख्यमंत्री सत्तेवर येईल.
कामगार नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या ,’पक्षाने शहरी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबरोबर कष्टकरी महिलांचा सत्कार केला ही चांगली बाब आहे . जगण्याच्या अधिकाराची लढाई स्त्रिया लढत असून स्त्रियांनी सर्व पक्षांना त्यासाठी योग्य धोरणे आखायला भाग पाडले पाहिजे ‘
डॉ माधवी वैद्य यांनीही सर्व क्षेत्रात मूल्य जपणारे मुलभूत काम स्त्रियांनी करावे असे आवाहन केले
पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ उज्वला हाके ,आमदार राहुल कुल ,रासप प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा ,उपाध्यक्ष दशरथ राउत ,महासचिव बाळासाहेब दोड्तले ,राष्ट्रीय खजिनदार पुंडलिक मामा काळे ,प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,महिला आघाडीच्या पुणे अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर,रोहिणी कसबे ,अजित पाटील ,संतोषी शिंदे ,राधिका धेंडे ,संगीता ढोके ,वैशाली वीरकर ,राजश्री पाटील उपस्थित होते


