राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी समाजात आदर्श ठरावेत : प्रा.गौरी देवस्थळे
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी डॉ. ए.पी.जे. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.शैला बूटवाला यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इम्तियाज हुसैन जहीद यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. नुसरत एस.शेख यांनी आभार मानले.
या दोन दिवसीय सत्रामध्ये प्रा. सलमा अजिज, विक्रम दुबाल, प्रा.नुसरत शेख, डॉ. मुशीर मुल्ला, प्रा.गौरी देवस्थळे, डॉ.अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विक्रम दुबाल यांनी आपल्या मेंदुला कशा प्रकारे चालना द्यावी यासाठी ‘ट्रेन द बे्रन’ या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.नुसरत शेख यांनी ‘सिकल सेल अॅनिमिया’ या आजाराविषयी मार्गदर्शन करताना त्याची कारणे, लक्षणे, सिकल सेल अॅनिमिया वरील उपचार आणि प्रतिबंध याची माहिती दिली.
एम.ए.रंगूनवाला डेंटल कॉलेज मधील दंतचिकित्सक डॉ. मुशीर मुल्ला यांनी तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. गौरी देवस्थळे म्हणाल्या ‘कोणत्याही पुस्तक, कादंबरी मधून राष्ट्रीय बळकटीसाठीमध्ये आवश्यक असलेल्या नैतिक मुल्यांविषयी ज्ञान मिळत नाही, ते ज्ञान कुटूंब, शिक्षक, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून शिकावे लागते. मोठ्यांना, शिक्षकांना, शेजार्यांना आदर दिला गेला पाहिजे. एनएसएस चे विद्यार्थी हे इतरांसाठी आदर्श ठरले पाहीजे.’
डॉ. अन्वर शेख यांनी एनएसएस चा इतिहास आणि विकास याविषयी माहिती दिली.