रासप पुणे शहर शाखेने मानले मुख्यमंत्री आणि स्वयंसेवी संस्थांचे आभार
पुणे : पुण्यात नवीन समाविष्ट 23 गावातील टेकड्यांवर बांधकामांना मनाई करण्याचा आणि तेथील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) चे आरक्षण कायम ठेवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वागत केले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने गुरुवारी सायंकाळी उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पुणे शहर संघटन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वयंसेवी संस्थांचे, पर्यावरण प्रेमी पुणेकर नागरिकांचे आभार मानण्यात आले. रासपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ. उज्जवला हाके यांनी या मेळाव्यात आभार मानणारा ठराव मांडला. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भांतब्रेकर, शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, संघटक जेमिश पठाण, युवक अध्यक्ष अंकुश देवडकर, सुरज खोमणे, नीलश निढाळकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
“बीडीपी आरक्षण कायम ठेवल्यामुळे पुण्यातील पर्यावरण सुरक्षित राहणार आहे, नागरिकांचे जगणे सुसह्य होणार आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही निर्णय प्रक्रियेतील सर्वांचे आभार मानतो.’ असे रासपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ. उज्जवला हाके यांनी या मेळाव्यात सांगितले.
या मेळाव्यात पुण्यातील सर्व विधान सभा मतदार संघातील कार्यकारिण्याच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांना पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भांतब्रेकर, शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, संघटक जेमिश पठाण, युवक अध्यक्ष अंकुश देवडकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
विनायक रुपनवर, उमेश कोकरे, भगवान शिंदे, सायली शिंदे, मंगल घोडके यावेळी उपस्थित होते


