पुणे :
‘राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सत्ताधाऱ्या मित्र पक्षाबरोबर असला तरी उपेक्षित ,वंचित ,गरीब ,शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न हाती घेवून ठामपणे कार्यरत राहील . या उपेक्षितांची प्रश्न सोडवणुकीसाठी पक्षयंत्रणा कार्यरत राहील ‘ असा निर्वाळा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी आज दिला
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित करियर महोत्सव आणि बेरोजगार मेळाव्यात उद्घाटन करताना ते बोलत होते . अध्यक्ष स्थानी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा होते ,
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजीव नगरकर उपस्थित होते . रविवारी ओसवाल बंधू कार्यालयात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता .
जानकर म्हणाले ,’ गुणवान आणि गरजू युवक -युवतींना पक्ष तज्ञांच्या मदतीने चांगल्या नोकऱ्या आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल . त्यासाठी हा राज्यातील पक्षाचा करियर महोत्सव उपयुक्त ठरेल पण युवकांनी नोकऱ्यांवर समाधानी न राहता उद्योजक होण्याची स्वप्ने पहावीत . स्पर्धेचे युग आहे तरी नकारात्मक दृष्टीकोन न बाळगता भवितव्य घडवावे. राष्ट्रीय समाज पक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही आगामी काळात सुरु करणार आहे ‘
प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत ,प्रवक्ते दीपक बिडकर ,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख डॉ उज्वला हाके ,मराठवाडा महिला आघाडी प्रमुख रोहिणी कसबे ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,पुणे जिल्हाधाय्क्ष संदीप चोपडे ,उपाधाय्क्ष बापूराव सोनवलकर ,हरीश खोमणे ,दीपक मासळ ,रोहित बोरकर ,सचिन शेंडगे ,जय कसबे उपस्थित होते
सुरज खोमणे यांनी प्रास्ताविक केले . सोनाली गावडे . यांनी सूत्रसंचालन केले