मागील वर्षी हा पुरस्कार पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आला होता
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना ‘सातारा रत्न ‘ पुरस्कार जाहीर
मुंबई –
‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान‘च्या वतीने देण्यात येणारा ‘सातारा रत्न ‘ हा पुरस्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना जाहीर झाला आहे . मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथील सातारावासीयांचा मेळावा २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता परळ येथील दामोदर हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे . पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी ही माहिती पत्रका द्वारे दिली
श्री महादेव जानकर यांनी राजकीय ,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा सातारा वासियांकडून यानिमित्ताने सन्मान केला जात आहे . श्री जानकर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्या मातोश्री अजून तेथे राहतात . अभियंता असलेल्या जानकरांनी समाजाच्या उत्थानाची शपथ घेवून अविवाहित राहून ,संसारापासून लांब राहून ,घरदार न करता राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला . या पक्षाचे हे तप पूर्ती वर्ष आहे . राज्यातील सत्ता परिवर्तनात त्यांच्या पक्षाचा महत्वाचा वाटा आहे .