पुणे :
‘गन फॉर ग्लोरी अॅकॅडमी’ व ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या वतीने बालेवाडी (पुणे) येथे घेण्यात आलेल्या ‘ऑल इंडिया चॅम्पियनशीप’ नेमबाजी स्पर्धेत संग्राम उमेश माने याने सुवर्णपदक पटकावले आहे.
रायफल आणि पिस्टल या प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये संग्राम माने याने 10 मी. ‘पिपनाईट एअर रायफल नॅनल रूल्स’ या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले, तर कनिष्ठ गटामध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे. संग्राम माने हा ऑलिम्पिक विजेते गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी अॅकॅडमी’मध्ये दोन वर्षांपासून सराव करतो आहे.
संग्राम हा ‘अभिनव विद्यालया’त शिकत असून, त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चाफेकर व क्रीडा शिक्षक संजय भालेराव यांनी त्याचे अभिनंदन केले.