पहा या चित्रपटाचा ट्रेलर
नवी दिल्ली-६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारत अनेक पुरस्कार पटकवलेत. ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किला’ या मराठी चित्रपटाला विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार आणि रवी जाधव यांच्या ‘मित्रा’ ला बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

