राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची मुस्लिम आरक्षण रद्द निर्णय विरोधी निदर्शने
पुणे :
मुस्लिम आरक्षणाचा आघाडी सरकारचा निर्णय रद्द झाल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आज (शुक्रवारी दुपारी ) पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय -विधान भवन (कौन्सिल हॉल ) येथे जोरदार निदर्शने केली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे शहर अध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली हि निदर्शने आयोजित करण्यात आली होती . युती सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला .
‘ मागास मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता . मात्र ,युती सरकारने जातीयवादी राजकारण करीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेवून आपले खरे रंग दाखवले आहेत . आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो ‘ असे अजित बाबर यांनी म्हटले आहे
‘मुस्लिम समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ‘, ‘ युती सरकारचा धिक्कार असो ‘ असे फलक युवकांनी हाती घेतले होते .
निदर्शन प्रसंगी रिझवान शेख ,अलिक मोमीन ,शिल्पा भोसले ,इक्बाल शेख ,मंगेश गोळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . या निदर्शन प्रसंगी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता