दिल्ली :
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी समन्स जारी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, विजयसिंह मोहिते पाटील, अॅड. वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या भेटीपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रॅली काढून मनमोहन सिंगाना पाठिंबा दर्शविला होता.