मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी विधानभवन, मुंबई येथे विधानसभा सदस्य डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी आमदार मधु चव्हाण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सहसचिव अशोक मोहिते, सहसचिव तथा सभापतींचे सचिव महेंद्र काज, उपसचिव सुभाषचंद्र मयेकर, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे, श्रीकांत शेट्ये, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

