लखनऊ-‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. त्यासाठी घाई करण्याची गरज नसून आम्ही सरकारवर कोणताही दबाव टाकणार नाही,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.. येथे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक शुक्रवारपासून सुरु झाली आहे. त्यानिमीत्त आयोजित पत्रकार परिषदते संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर या मुद्यावर सरकारच्यावतीने अद्याप काय केले गेले याची कोणतीही माहिती नाही. राममंदिराबद्दल संघाने भाजपला विचारणा करण्याची गरज नसल्याचे होसाबळे म्हणाले. भाजप सरकारला पूर्ण बहुमत आहे, 2019 पर्यंतचा त्यांच्याकडे अवधी आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ दिला पाहिजे. या मुद्यावर संघ सरकारच्या कामात दखल देऊ इच्छित नाही, असे होसाबळे यांनी सांगितले. तसेच भाजच्या जाहीरनाम्यातील या मुद्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलण अधिक उचित असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित संघ कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांवर अयोध्येतील शरयू नदी, राम आणि मंदिराची छबी आहे.
बैठकीच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुर परिस्थिती, सीमेवर सुरु असलेला गोळीबार यावर चर्चा झाल्याचे होसाबळे यांनी सांगितले. लव्ह जिहादच्या मुद्यावर ते म्हणाले, यावर संघाने फार आधीच चर्चा केली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी रणनीती आखली जाईल.दुसरीकडे समाजवादी पार्टीने लखनऊमध्ये होत असलेल्या या बैठकीला जातियवादी षडयंत्र म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘रास्वसंघ अशा बैठका घेऊन राज्याची वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे.’
‘राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा पण सरकारवर दबाव टाकणार नाही -संघ परिवार
Date: