रामोशी समाजाला महामंडळ मिळावे : आ . महादेव जानकर यांची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आद्यक्रांतिवीर
उमाजी नाईक यांच्या 224 वी जयंती साजरी
पुणे :
रामोशी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणात पुढाकार घेणे गरजेचे आहे , या समाजातून स्पर्धा परीक्षात यशस्वी होणारे युवक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत राज्य शासनाने रामोशी समाजाला महामंडळ द्यावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज जाहीर केले .
राष्ट्रीय समाज पक्ष आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक राजे संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मभूमी असलेल्या भिवडीमध्ये आज (दि. 7) 224 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम राजभवन भिवडी (ता. पुरंदर) येथे सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी झाला. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतरे ,खासदार अमर साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून आमदार महादेव जानकर बोलत होते
रामोशी समाजाला महामंडळ द्यावे यासाठी आपण मुख्य मंत्र्यांची भेट घेवू ,तसेच भिवडी येथे राष्ट्रीय स्मारक उभे राहावे यासाठी प्रयत्न करू ‘असे महादेव जानकर यांनी यावेळी जाहीर केले
कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर , प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर ,प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष दशरथ राउत , संपतराव टकले ,महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर ,बापूराव सोनवलकर ,सुरज खोमणे ,मल्लिकार्जुन पुजारी ,डॉ उज्वला हाके उपस्थित होते
महोत्सव समिती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरसेवक यशवंत भांडवलकर, तुषार खोमणे, अशोक खोमणे, पोपटराव खोमणे, माऊली खोमणे यांनी केले. सकाळी 11 वाजता जेजुरी गडावर अभिषेक झाला. सासवड नगरपरिषद ते भिवडी असा भव्य मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी भिवडी येथील शासकीय स्मारकात अभिवादन आणि डॉ. नारायण टाक यांचे व्याख्यान झाले.
क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या काशिलिंग आडके, अशोक गुंजाळ, संजय बोडरे यांच्यासह युवा शास्त्रज्ञ डॉ. नीलेश तरवळ यांचा करण्यात आला. यावेळी शंकरभाऊ तडाखे, पुणे (समाज गौरव), रघुनाथ मदने, सांगली (समाजभूषण), संजयराव बोडरे, सातारा(क्रीडाभूषण), पंडीत मोडक, पुणे (जीवनगौरव), पुंडलिक काळे, बारामती (समाजभूषण), युवा नेते संजय जगताप (सहकारभूषण), शिवराज झगडे, जेजुरी (पत्रकार), ऋतुराज काळे, बारामती (समाजगौरव) यांना पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले.