मुंबई -शरद पवार यांनो अलिबागमध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची अजिबात शक्यता नाही. सरकार राहणार की जाणार याच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत, असा दावा केला आहे. यामुळे शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली
खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शरद पवारांनी यापूर्वी भाजपला स्थिर सरकारसाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत वक्तव्य आठवावे. पवारांनी भविष्यवाणी केली असली तरी राज्यात मध्यावती निवडणुका होण्याची अजिबात शक्यता नाही. सरकार राहणार की जाणार याच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. पण निवडणुका होणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे असे संजय राऊत म्हणाले . शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्यानंतर पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली आहे.