मुंबई : राज्यात उद्योगधंदे वाढीस लागावे यासाठी परदेशातील उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शासन निश्चितच प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
युरोपियन बिझनेस ग्रुपच्या ‘इबीजी पोझिशन पेपर 2015’ या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमीत मलिक, इबीजी नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष रमण सिद्धू, इबीजी मुंबईचे सदस्य ॲन्टोनिया फस्यानो तसेच युरोपियन बिझनेस ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, राज्यामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी यापूर्वी विविध प्रकारच्या 76 परवानग्या घ्याव्या लागत असत. त्याचे प्रमाण 37 वर आणण्यात आले असून त्या 25 पर्यंत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यामध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून यासाठी युरोपियन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.