नवी दिल्ली – राज्यसभा सभागृहातील मच्छर छळतात-त्यांचा बंदोबस्त प्रथम करा अशी मागणी खुद्द जया अमिताभ बच्चन यांनी केली आहे .सभापती पी.जे.कुरियन यांनी यावर , संबंधीत विभागाशी संपर्क करुन यावर लवकरच उपाय शोधला जाईल.असे आश्वासन त्यांना दिले आहे राज्यसभा सदस्यांनी सभापतींकडे मच्छरांची तक्रार केली आहे. बुधवारी सभागृहात चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापतींकडे तक्रार केली, की जेव्हा सभागृहाचे कामकाज सायंकाळी सहा नंतर सुरु असते तेव्हा मच्छराचा मोठा उपद्रव असतो.
राज्यसभा सभागृहातील मच्छर छळतात-त्यांचा बंदोबस्त करा -जया बच्चन यांची आग्रही मागणी
खासदार जया बच्चन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी सभापतींना सल्ला दिला की सभागृहात फॉगिंगची व्यवस्था केली पाहिजे, ज्यामुळे मच्छरांचा त्रास सदस्यांना होणार नाही. जया बच्चन यांच्याशिवाय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी देखील जया यांच्या तक्रारीचे समर्थन केले. मच्छरांमुळे सदस्यांना मोठा त्रास होत आहे. यापासून लवकर सुटका झाली पाहिजे.