राजाराम पूल ते म्हात्रे पूल रस्ता अपघात प्रवण करण्याचे काम महापालिकेचे … खर्डेकर
पुणे- राजाराम पूल ते म्हात्रे पूल रस्ता अपघात प्रवण करण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे असा आरोप भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी केला आहे
या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे या पत्रात असे म्हटले आहे कि ,
राजाराम पूल ते म्हात्रे पूल या डी.पी रस्त्यावर सुरु असलेले कॉन्क्रीटीकरण काम अचानकपणे थांबविण्यात आले व शहरातील उत्तम रस्त्यांपैकी एक असलेला हा रस्ता अपघात प्रवण करण्याचे पातक मात्र मनपा प्रशासनाच्या उत्तम नियोजनास दिले पाहिजे.
राजाराम पूल ते हॉटेल आमची पर्यंत अर्धा रस्ता कॉन्क्रीटीकरण झाले आहे तर त्याच्या पुढे असलेल्या ज्ञानदा शाळेसमोर रस्ता अर्धा खोडून ठेवला असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्याच्या पुढे म्हणजे शुभारंभ मंगल कार्यालयासमोर तर हा रस्ता खरवडून ठेवला आहे.
मनपा प्रशासन या रस्त्यावर अर्धवट काम करून एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का ?
या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात,कृपया त्याचे योग्य निराकरण करावे अन्यथा आंदोलनास बाध्य व्हावे लागेल यांची नोंद घ्यावी.
याच बरोबर या पत्रातून त्यांनी काही प्रश्न हि आयुक्तांना केले आहेत …ते पुढीलप्रमाणे
१) सदर काम का थांबविले ?
२) सदर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण पूर्ण ३० मीटर चे करणार का ते ही अर्धवट ? त्यासाठी रुंदीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ?
3) नदीपात्रातील रस्ता म्हात्रे पुलाखालून या डी.पी रस्त्यास कधी जोडणार ? तेव्हा या कॉन्क्रीटीकरण झालेल्या रस्त्यास खोदावे लागणार नाही ना ?
४) हा रस्ता राजाराम पुलाच्या पुढे पूर्ण करण्यात काय अडथळे आहेत ? तेथे हा शिवणे खराडी नियोजित मार्गास जोडला जाईल का ?
5) पोलीस खाते व मनापा अधिकार्यांनी पूर्वी केलेल्या निर्णयानुसार या रस्त्यावर फुटपाथ बांधणे व रोड डिव्हायडर टाकण्याचे काम केले जाणार आहे किवा कसे याचा ही खुलासा आवश्यक आहे.
वरील मुद्द्यांचा खुलासा करावा व या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांचा त्रास दूर करावा तसेच संभाव्य अपघात टाळावेतअशी मागणी हि खर्डेकर यांनी या पत्राच्या शेवटी केली आहे