पुणे-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेली प्रख्यात जलतरणपटू; ‘ यलो ‘या गाजलेल्या,राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाची नायिका,पुण्याच्या स. प . महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी शेखर गाडगीळ … हिच्या वाटचालीबद्दल, ध्येयपूर्तीसाठी घेतलेल्या परीश्रमाबाबत आणि गौरी बद्दल मान्यवरांचे लेख असलेल्या ‘राजहंस ‘ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते नव्या पेठेतील पत्रकार भवन येथील मुख्य सभागृहात होत आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणपटू म्हणून अनेक पारितोषिके मिळवलेल्या गौरीबद्दल राष्ट्रपतींपासून , बॉलीवूड मध्ये उत्कंठा निर्माण झाली . गौरीची कारकीर्द पाहून अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘यलो ‘ सिनेमाची निर्मिती केल्यावर तर गौरी ची ख्याती आणखी सर्वदूर पोहोचली . बॉलीवूड मधून ‘यलो ‘ चा हिंदी रिमेक करण्याची देखील घोषणा झाली . अनेक पुरस्काराने सन्मानित होवूनही गौरीने स प महाविद्यालयातील आपली वाटचाल अबाधितपणे सुरूच ठेवली आहे . या सर्व गोष्टी विचारात घेवून आता तिच्यावर ‘राजहंस ‘ हे पुस्तक येत आहे ज्याची लेखिका गौरीची आई सौ.स्नेहा गाडगीळ स्वतः आहे . या पुस्तकाला हेमलकसा चे ज्येष्ठ समाजसुधारक डॉ.प्रकाश आमटे यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात अभिनेता रितेश देशमुख , उपेंद्र लिमये , अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच संध्या देवरुखकर , कमांडर राजेंद्र दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवरांचे गौरी विषयीचे लिखाण आहे .
सामना चे सहायक संपादक अरुण निगवेकर तसेच अभिनेता उपेंद्र लिमये , दिग्दर्शक महेश लिमये हे देखील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .