पुणे-जुन्या पुणे मुंबई मार्गावरील “पुणे मेट्रो आणि बीआरटी” मार्गाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित विस्तारीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी संरक्षण खात्याच्या जमिनीवरील कामास (संपादन आणि विस्तारीकरण) तातडीने मंजुरी मिळावी याकरिता केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच संरक्षण सचिव बरून मित्रा ह्यांची आज दिल्लीत संसदीय अधिवेशन दरम्यान भेट घेऊन ह्यासंबंधी विनंती करणारे पत्र दिल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. ” शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपयुक्त अशा पुणे मेट्रो आणि बीआरटी ह्या कामांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शहरी विकास विभागाकडून ह्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाकडेवाडी ते हरीस पूल ह्या मार्गावरील एकूण ५.७ किलोमीटर अंतरामधील २.२ किलोमीटर अंतर हे संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीत येत आहे. त्यामुळे ह्या कामाची पूर्तता लवकरात लवकर होण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना आज भेटून पत्रासाहित विनंती केली असल्याचे शिरोळे ह्याप्रसंगी बोलताना म्हणाले.
रस्तारुंदीकरणसाठी खा. शिरोळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट
Date: