रविवार, दि. 28 जून रोजी मतदार यादी शुद्धीकरणाची जिल्हा प्रशासनाची मोहीम

Date:

 

पुणे,: राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण आणि मतदार यादीशी आधारकार्ड संलग्नीकरण करण्यासाठी उद्या रविवार, दि. 28 जून 2015 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मतदार यादी शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण करण्याचे काम तसेच मतदारांचे आधार कार्ड संलग्नीकरण करण्याचे कामासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदारांची छायाचित्र मतदार ओळखपत्रातील माहिती आणि आधारकार्ड मधील माहिती याची सांगड घालणे, दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि ओळखपत्रातील चुका दुरूस्त करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे या मोहिमेचे उद्देश आहेत.
मतदान छायाचित्र ओळखपत्र व आधार कार्डशी संलग्न करण्याकामी पर्याय http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Upload Your aadhar या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आपणास मतदान छायाचित्र ओळखपत्र व आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी www.eci.com या संकेतस्थळावर National Voters Services Portal (NVSP) या पोर्टलमध्ये Feed your Aadhar Number ला क्लिक करा व तुमचे नाव ईपीएफ नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी भरून माहिती Submit करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रविवार, दि. 28 जून 2015 रोजी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागातील क्षेत्रीय कार्यालये, मतदान केंद्रे, गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती कार्यालये आणि नगर पालिका आणि परिषद कार्यालये येथे केंद्रे सुरु राहतील. याठिकाणी सर्व नागिरकांनी संपर्क साधून या मोहिमेचा लाभ घ्यावा.
मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी. यादीतून वगळलेल्या किंवा वगळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नावाची यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1950 किंवा जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
मतदारयादीत बदल करण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज भरून द्यावे. हे अर्ज फक्त मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
अर्ज खालील प्रमाणे
नमुना क्रमांक 7 – मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी
नमुना क्रमांक 8 – मतदार यादीतील तपशीलात बदल करण्यासाठी
नमुना क्रमांक 8 अ – विधानसभा मतदार संघातंर्गत पत्ता बदलण्यासाठी
प्रपत्र अ – मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक यांची सांगड घालण्यासाठी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले,याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज

-माजी आमदार मोहन जोशी पुणे : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी...

४०० केव्ही वाहिन्यांना अंडर व्होल्टेजचा धोका;ग्रामीण भागात विजेचे अर्धा तास भारनियमन

पुणे, दि. १२ मार्च २०२५: विजेची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात...

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी...