पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून सकाळी झाला . रमेश बागवे आणि त्यांच्या पत्नी सौ. जैन्नब बागवे यांनी खना नारळाने ओटी भरून भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. आजचा प्रचार प्रभाग क्रंमांक ४७ हरकानगर , राजेवाडी या भागात झाला .
भवानी माता मंदिर , प्रथम – जुना मोटार स्टण्ड , सरस्वती सोसायटी , पदमजी चौकी , कादरी मंझील , जिज्ञाचा मार्गसा वसाहत , मिलिंद मंडळ , जयभीम मंडळ , एस. आर. ए. वसाहत , पत्र्याची चाळ , प्रगतीशील मंडळाच्या गल्लीमधून , कॉलनी नंबर १२ , बाहेर निघून ए. डी. कॅम्प चौक , किराड हॉस्पिटल , संत कबीर चौक , भोर्डे आळी , इस्लामपुरा . रास्ते मांग वाडा , राजेवाडी , भवानी पेठ पोलिस लाईन , पदमजी चौकातून निशात टाकीज , गाडी अड्डा , मंजुळाबाई चाळ , वॉचमेकर चाळ , गणपत भोई चाळीतून चुडामण तालीम चौक , नवीन हिंद समोरून चुडामण तालीम वसाहत , बाहेर निघून ७१७ भवानी पेठ कब्रस्थान मागे , हरकानगर वसाहत , ५१२ भवानी पेठ , मेमजादे अपार्टमेंट , बर्फाचा कारखाना , तबेला , नानेशा कॉर्नर अशा मार्गाने समारोप झाला .
या पदयात्रेत पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, हाजी नदाफ , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक अविनाश बागवे , माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक संगीता पवार , करण मकवानी , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विनोद संघवी , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेवक सुधीर जानजोत, स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख ,अनिस सुंडके ,पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित दरेकर , रमेश अय्यर , जया किराड , विठ्ठल थोरात , वाल्मिक जगताप , रफिक शेख , सोमनाथ किराड , विरु किराड , झोपडपट्टी सेलच्या महिला अध्यक्षा सुरेखा खंडागळे , भगवान धुमाळ , राजेश शिंदे , राजाभाऊ चव्हाण , बबलू सय्यद , स्मिता मुळीक, चेतन अग्रवाल , सुनील घाडगे , जोस्वा रत्नम , जोसेफ अंथोनी , रशीद खिजर , व कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते .