पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची सांगता दुचाकी रेलीने उत्साहात संपन्न झाली डायस प्लॉटपासून या दुचाकी रेलीस सुरुवात झाली , हि दुचाकी रेली अप्सरा टाकीज , सेवन लव्हस चौक , नेहरू रोड , काशेवाडी , भवानी पेठ , नाना पेठ , राजेवाडी , संत कबीर चौक , पावर हाउस चौक , नरपतगीर चौक , मंगळवार पेठ , जुना बाजार, पुणे स्टेशन , ढोलेपाटील रोड , ताडीवाला रोड , प्रायव्हेट रोड ,बोटक्लब रोड , कोरेगाव पार्क रोड , सर्किट हाउस , घोरपडी , बी. टी. कवडे रोड , फातिमानगर , पुणे कॅम्प , महात्मा गांधी रोड , ताबूत स्ट्रीट , बाबाजान चौक , भोपळे चौक , कुरेशी नगर , कुंभारबावडी मार्गे ट्रायलक चौकात रेलीची सांगता झाली .
या दुचाकी रेलीमध्ये रमेश बागवे , जैनब बागवे , माजी आमदार मोहन जोशी ,पी. ए. इनामदार , विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , नगरसेवक सुधीर जानजोत , स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , अनिस सुंडके , रशीद शेख , माजी महापौर रजनी त्रिभुवन , नगरसेविका लक्ष्मी घोडके , लता राजगुरू नगरसेवक अविनाश बागवे , शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगीता तिवारी , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक शैलेंद्र बिडकर , प्रसाद केदारी , करण मकवानी , माजी उपाध्यक्ष विनोद मथुरावाला , गौतम महाजन , मौलाना काझ्मी , राजेश शिंदे , असिफ शेख , सुहास टेकवडे , कुलदीप बागवे , यासेर बागवे, सादिक लुकडे , मेहबूब नदाफ , सुजित यादव , वाल्मिक जगताप , केविन मेनवेल , व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी रमेश बागवे यांनी सांगितले कि , कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून , प्रचंड मेहनतीवर विकासाच्या जोरावर कॉंग्रेसचा विचार तळागाळातनेला , आपण या मतदार संघात विकासाची कामे केली . तरी विरोधक म्हणतात , विरोधकांनी काहीच काम केले नाही , नवा विचाराने आपण सर्वांनी काम केले आहे , त्यातून कॉंग्रेसने मतदारसंघाचा विकास केला . बाबासाहेबांचे अनुयायी विचाराने चालणारे आहेत , पैशाने नव्हे , त्यामुळे मताचा अधिकार विकणार नाही , येणारे १५ ऑक्टोंबर रोजी विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देणार पुढील निवडणुकीत विरोधक उमेदवार उभाच राहणार नाही , झोपडपट्टीचा विकास आणि सर्व सामान्य जनतेची जीवन शैलीमध्ये बदल करण्यासाठी कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचा सर्वागीण विकास हाच माझा ध्यास आहे , कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुणे कॅंटोन्मेंटचा विकास साधणार , निवडणुकीच्या दिवशी कॉंग्रेसच्या पंजासमोरील बटन दाबून कॉंग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पी. ए. इनामदार यांनी सांगितले कि , रमेश बागवे यांना निवडून द्या , त्यांना लाल दिवा आणण्याचे काम आपण करणार आहे , निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांनी अथक परिश्रम घ्यावेत , असे आवाहन त्यांनी केले .यावेळी अरविंद शिंदे यांनी सांगितले कि , रमेश बागवे यांनी सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्वाना बरोबर घेऊन पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात विकास कामे केली आहेत , त्यासाठी जास्तीत जास्त विकास निधी खर्च केला आहे . त्यांनी पहिली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला आहे . निवडणुकीसाठी राहिलेल्या वेळेमध्ये कार्यकर्त्यांनी जागरूकतेने काम करावे , आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी विनंती करावे .यावेळी सदानंद शेट्टी यांनी सांगितले कि , रमेश बागवे राज्यात सर्वात मताधिक्याने विजयी होणारच आहे , आणि रमेश बागवे आपल्या विजयाने आमदारकीची हेट्रीक करणारच ,पुणे शहरात रमेश बागवे सर्वाधिक मताधिक्यानी विजयी होणार. या सांगता सभेचे सूत्रसंचालन विठ्ठल थोरात यांनी केले . या प्रचाराची सांगता सभेच्या वेळेस सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ” कहो दिलसे , रमेश बागवे फिरसे ” असा जयघोष दुमदुमला .