पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या ‘रमणबाग संगीत सभे’ची पंचवीसाव्या मैफलीत पंडित विनय कोपरकर यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सालग वराळी रागात झपताल, त्रितालातल्या बंदिशी सादर केल्या, मियॉंकीतोडी, शुध्द सारंग रागात मध्य आणि दृत लयीतले तराणे सादर करुन भैरवीने गायनाची सांगता केली. पंडित रामदास पळसुलेंनी तबल्यावर आणि राहुल गोळे यांनी हार्मोनियमवर साथ-संगत केली.
रमणबागेच्या कलाग‘ाममध्ये दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत संगीत सभेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी आणि नवोदितांना गायन, वादनाच्या विनामूल्य शिक्षणाबरोबर स्वतंत्रपणे कला सादर करता येते. तानसेन आणि कानसेन निर्माण होण्याच्या प्रकि‘येतील हा शाळेचा छोटासा प्रयत्न असल्याचे मु‘याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी म्हटले आहे.
शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक अजय पराड, उपशिक्षक सुहास देशपांडे यांनी उपक‘माचे संयोजन केले.