

मुंबई -वयाच्या १० व्या वर्षापासून मॉडेल आणि अभिनय या क्षेत्राशी निगडीत असलेल्या आणि १९८१ मध्ये आलेल्या ‘एक दुजे के लिये’ या हिंदी सिनेमाने प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेवून बसविलेल्या अभिनेत्री रती अग्निहोत्रीने आपल्या वयाच्या ५५ व्या वर्षी नवऱ्याच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. फेब्रु. १९८५ मध्ये रती चे अनिल वीरवाणी यांच्याशी लग्न झाले तनुज नावाचा २८ वर्षाचा मुलगा या दाम्पत्याला आहे .रती आणि अनिल यांचा मुलगा तनुज वीरवानीने नुकतेच २०१३ मध्ये लव्ह यू सोनियो आणि २०१४ मध्ये ‘पुरानी जींस’ द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे . वरळी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. कलम 350, 323, 506, 498ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रती अग्निहोत्री यांनी लावलेल्या आरोपांनुसार त्यांचे पती अनिल वीरवानी यांनी 7 मार्च रोजी त्यांना बेदम मारहाण केली.


