राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा

Date:

पुणे, दि. ११: भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात भाग घेऊ शकतील. त्यासाठी https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. याच संकेतस्थळावर भरतीप्रक्रियेबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती भरती कार्यालय, मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणेचे संचालक मेजर येसू राजू के यांनी दिली आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...