हॉंगकॉंग- युरोपातील सगळ्यात मोठी बॅंक ‘एचएसबीसी’ ५० हजार कर्मचार्यांची कपात करणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी मंगळवारी जाहीर केले. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. जवळपास २० टक्के कर्मचार्यांची कपात केली जाणार आहे. परिणामी, एचएसबीसी यासाठी आपली गुंतवणूक मर्यादा सीमित केली आहे. ज्यात जास्त जोखीम असेल तिथे बँंक२९० अब्ज डॉलर्सने कमी गुंतवणूक करणार आहे.कपात केल्यानंतर एचएसबीसीमध्ये फक्त२ लाख ८हजार कायमस्वरुपी कर्मचारी उरतील. २०१० मध्ये बॅंके मध्ये एकूण२ लाख ९५ हजार कर्मचारी होते. दरम्यान २०१४ मध्ये ही संख्या २ लाख ५८ हजारवर आली होती. आता बॅंकेने सुमारे५० हजार कर्मचार्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कपाती प्रक्रीया २०१७पर्यंत चालणार आहे.
युरोपातील सगळ्यात मोठी बॅंक ‘एचएसबीसी’ ५० हजार कर्मचारी काढून टाकणार –
ब्राझिल आणि तुर्की येथील बँकेच्या शाखेतून जवळपास २५ हजार तर मुख्य शाखेतून २२ते २५ हजार कर्मचार्यांना घरी बसवण्यात येणार आहे. गुंतवणूकदार आणि विश्लेषकांना मार्गदर्शन देण्यापूर्वी एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुलिवर यांनी हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजला ही धक्कादायक माहिती दिली. स्टुअर्ट गुलिवर हे आपला सगळ्या मोठा स्ट्रॅटजिक प्लानचा आढावा गुंतवणूकदारांना दिला.