Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यंदाचा १४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते २१ जानेवारी दरम्यान

Date:

piff1

पुणे  :  पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १४ ते २१ जानेवारी २०१६ दरम्यान होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून यंदाच्या महोत्सवासाठी प्राथमिक निवड प्रक्रिया प्रवेशासाठी १०४ पेक्षा जास्त देशातील तब्बल ९८६ चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर, एन.एफ.ए.आय चे संचालक प्रकाश मगदूम आणि डि. एस. के. एन्टरटेनमेंट चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज जगाला दहशतवादाची झळ बसत असताना केवळ ‘खेळ’ आणि ‘चित्रपट’ ही दोन अशी माध्यमे आहेत की ज्याद्वारे टोकाचे शत्रुत्व असलेले देशही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सलोखा वाढविण्याच्या दृष्टीनेच ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. या महोत्सवा दरम्यान जगभरातील अनेक देशांचे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

महोत्सवादरम्यान एकून १५ विभागांपेक्षा जास्त विभागात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ज्यामध्ये उद्घाटनपर चित्रपट, पुरस्कार्थींचे चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धात्मक विभाग, मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धात्मक विभाग (कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद एक पर्यटन स्थळ – बिवी का मकबरा), जागतिक चित्रपट, देश विशेष (कंट्री फोकस), विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप), खेळ व चित्रपट, मनुष्याचे अंतरंग (ह्युमन माईंडस्), साहित्य आणि चित्रपट, डीएसके अॅनिमेशन चित्रपट, बदलत्या महाराष्ट्रावरील लघुपट, सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचे मराठी चित्रपट (मराठी सिनेमा टुडे), फिल्म्स् डिव्हिजन माहितीपट, जेम्स फ्रॉम नॅशनल फिल्म्स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय), ट्रीब्युट, आशिया खंडामधील मधील चित्रपट अशा विभागांचा समावेश असेल.

यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ७ वेगवेगळ्या ठिकाणी या महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या बरोबर पिंपरी-चिंचवड येथील दोन स्क्रीन्सचा समावेश असेल.’’

महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांशी निगडीत विषयांवरील परिसंवाद आणि मिडीया सेंटरमध्ये होणारी दररोजची भारतीय व परदेशी मान्यवरांची मनोगते, मुलाखती ही नित्याची वैशिष्ट्ये याही वर्षी असणार आहेत.

महोत्सवात जागतिक स्पर्धात्मक विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ (१० लाख रुपये), ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्कार (५ लाख), मराठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागात ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट मराठी चित्रपट’ (रोख पुरस्कार ५ लाख रुपये) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट छायांकन यासाठी प्रत्येकी रु. २५ हजार असे रोख पुरस्कारही दिले जाणार आहेत.

फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर्स, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनीमुद्रण यासाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटास (भारत) १००० अमेरिकन डॉलर्स आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर्स अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धा’ पुरस्कार या विभागात कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद, एक पर्यटन स्थळ –बिवी का मकबरा या तीनही विभागासाठी प्रथम क्रमांकास रुपये १ लाख २५ हजार तर द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७५ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

याशिवाय एफटीआयआयच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मारिया प्रोशस्कोवा संस्थेतर्फे ‘पिफ स्पेशल अॅवॉर्ड’ (२५ हजार रुपये रोख) ही देण्यात येईल.

अधिकृत ओळखपत्र असलेल्या फिल्म क्लब सभासद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पिफ’च्या कॅटलॉगची किंमत रुपये ५०० असून इतर इच्छुकांसाठी ही किंमत रुपये ७०० इतकी असेल याची कृपया नोंद घ्यावी.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना आजपासून (४ डिसेंबर) www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोदंणी क्रमांकासोबत इच्छुकांना वरील ठिकाणांवर जाऊन स्पॉट रजिस्ट्रेशनही करावे लागेल हेही महत्वाचे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २९ डिसेंबरपासून सुरू होईल, असेही रवी गुप्ता यांनी सांगितले.

महाराष्ट्र इंस्टिट्युट  ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, भारती विद्यापीठ, डीएसके सपइन्फोकॉम संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विशेष सहकार्य यावर्षीच्या महोत्सवास प्राप्त होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...