पुणे : बांधकाम कौशल्य विकास या श्रेणीतील कामगिरीसाठी कुशल क्रेडाईला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार बांधकाम उद्योग विकास परिषद (सीआयडीसी) यांनी सुरु केले असून ‘कुशल’ यांना हा पुरस्कार मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. याच श्रेणीमध्ये त्यांना २०१२मध्ये पुरस्कार मिळाला होता.यातून ‘कुशल’ यांनी हाती घेतलेल्या आदर्श कामाचे आणि बांधकाम उद्योगाचे अग्रणी म्हणून २०१२ पासून त्यांनी घेतलेल्या आघाडीचे स्वरूप दिसून येते.
भारताचे माजी नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. किरीट पारीख यांच्या हस्ते हा पुरस्कार माजी कर्नल आणि कुशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. आर. शर्मा यांना दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
एकच पुरस्कार दोनदा मिळविण्यातून ‘कुशल’ ने स्वीकारलेला बांधकाम उद्योगातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा मार्ग अधोरेखित केला आहे. ‘कुशल’च्या स्थापनेपासून चार वर्षांच्या काळात हा १२ वा पुरस्कार असल्यामुळे बांधकाम उद्योगातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या ‘कुशल’च्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीचे वेगळेपण उठून दिसले आहे .

