पुणे–
रमजानच्या उपवासानिमित रविवार पेठमधील तांबोळी मस्जिदच्या येथे मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाच्यावतीने ‘ रोझा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष रशीद हसन खान यांनी केले होते . या कार्यक्रमात पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे , पुणे जिल्हा पालकमंत्री गिरिश बापट , खासदार वंदना चव्हाण , माजी आमदार उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , पुणे पोलिस आयुक्त के. के. पाठक , पोलिस उपायुक्त रामानंद , मकरंद रानडे , अरविंद चावेरीया , फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीषक रेखा साळुंखे , निवृत्त पोलिस अधिकारी विनोद सातव , अंकुश काकडे , पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक रवींद्र माळवदकर , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड , डॉ. सतीश देसाई , मस्जिदचे प्रमुख व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजनासाठी अफझल खान , बाबर शेख , मेहमूद हनीफ , शाहीद खान , अझहर खान , एजाज तांबोळी , शरद नरतेकर , हबीब बागवान , मज्जु पानवाले यांनी विशेष परिश्रम घेतले .