मार्केटिंग आणि प्रोजेक्शन चे आधुनिक तंत्र नरेंद्र मोदी अवलंबत आहेत हेच तंत्र त्यांनी केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी वापरले होते आणि सत्ता मिळविल्यानंतरही वापरत आहेत बाकी नवीन काही नाही ,परदेश दौऱ्यांमध्ये मनमोहनसिंग यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत होता ते हि चांगली कामगिरी करीत परंतु त्यांनी कधी त्याचे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन केले नाही . मनमोहन सिंग आणि मी असे आम्ही दोघे हि एकाच जमान्यातील राजकारणी आहोत फक्त सभा करायच्या आणि व्यासपीठावरून निघून जायचे एवढेच करीत असत . इंटरनेट सोशल मिडिया , वेब मिडिया व्हाटस अप कडे आम्ही लक्ष दिले नाही आता अन्य सर्वच पक्षातील तरुणाई हे पाहू लागली आहे असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , आताच्या सरकारला बहुमत आहे पण . पूर्वीच्या सरकारनेच घेतलेल्या निर्णयांचा अंमल सध्या दिसतो आहे भारत सरकार कडे २ वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचे वक्तव्य केले जाते पण यांचे सरकार आले मे महिन्यात मग धान्य पेरले कधी/ आणि उगवले कधी ? असा सवाल त्यांनी केला . आजकाल मार्केटिंग आणि प्रोजेक्शन आणि संवाद याकडे लक्ष दिले पाहिजे अशाच आशयाची गरज श्री पवार यांनी प्रतिपादित केली मोदी यांनी पंतप्रधान पदी असताना महाराष्ट्रात एवढ्या जास्त संख्येने सभा घेणे यावरूनच त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीला दिलेले महत्व लक्षात येते असे हि ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी अजित पवार यांनी चालविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील टिके संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले , मी कधी कोणाचे नाव घेत नाही , आणि व्यक्तिगत टीका हि करीत नाही आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना असाच सल्ला देईल त्यांनी व्यक्तिगत टीका टाळून विकास कार्यक्रम मांडावेत आघाडी का कशी तुटली यावरील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले , ‘ सोनिया गांधी ची आघाडी व्हावी अशीच पूर्णतः सकारात्मक भूमिका होती मात्र राज्यातील त्यांच्या पक्षाच्या फळी तून प्रतिसाद मिळाला नाही आणि आयत्यावेळी जिथे १३०/ १४० जागा लढायची तयारी करीत होतो तिथे राज्याची निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय घेण्याची वेळ आली एकाच दिवस उरला होता आणि राज्यातील काँग्रेस ने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि त्यात काही मतदारसंघ आमच्या वाटेचे होते अशा परिस्थितीत आमच्यापुढे पर्याय नव्हता आम्हाला २८५ जागा लढविण्याचे आव्हान स्वीकारावे लागले सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर जनतेपुढे जात आहेत हि चांगली संधी असली तरी परिस्थिती अवघड आहे आणि आव्हानात्मक आहे असे हि ते म्हणाले आमची जी तयारी होती त्याहून दुप्पट जबाबदारी आता येवून पडली आहे पण दिवसेंदिवस
आत्मविश्वास हि वाढतो आहे आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास आहे
सिंचन घोटाळा हा राष्ट्रवादी विरोधात प्रचारासाठीच तयार केलेला विषय आहे ते म्हणाले १० वर्षात जिथे ३० हजार कोटी खर्च झाला त्यात ७० हजार कोटीचा घोटाळा होईलच कसा ?यासंदर्भात राज्याच्या प्रमुखांनी ‘ केवळ १ ते २ टक्के पाणी वाढले असे केलेले वक्तव्यही वस्तुस्थितीला धरून केलेले नव्हते असे ते म्हणाले .
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले ,महाराष्ट्राच्या निर्मिती साठी शेकडोंनी प्राण दिले हे राज्य एकसंघ राहावे अशीच इच्छा राहील , पण तरीही मला वाटते हा निर्णय राजकारण्यांनी घेवू नये तो जनतेवर सोपवावा जनमत घेवून त्यावर निर्णय व्हावा , स्वतंत्र विदर्भाच्या नावाने ज्यांनी निवडणुका लढविल्या त्यांना नाही हे हि त्यांनी नमूद केले , मुंबई हे सर्वधर्मियांचे शहर आहे सर्वांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे मराठी – गुजराती हा वाद वाढवून असे अंतर वाढविणे आपल्याला मान्य नाही . आमचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत एखाद्या नेत्याचा चेहरा घेवून आम्ही निवडणूक लढवू शकत नाही असे सांगून ते म्हणाले निवडून आलेल्या विधिमंडळ सदस्यांचा कल पाहून निवड करण्याची पद्धत आमच्या पक्षात आहे भुजबळ – आर आर -क्षीरसागर अनिल देशमुख – अजित पवार अशी ८ ते १० मंडळी राज्याचे नेतृत्व उत्तम प्रकारे करू शकतील अशा ताकदीचे आहेत , सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना केंद्रात रस आहे राज्यात नाही असेही ते म्हणाले