” मेलडीज ऑन माऊथ ऑर्गन ” या ऑर्गनच्या १०० व्या शतकी महोत्सव उत्साहात संपन्न

Date:

 

छोट्याश्या माउथ ऑर्गनने रसिकांच्या मनावर राज्य  केले . निमित होते शामकांत सुतार यांच्या ” मेलडीज ऑन माऊथ ऑर्गन ” या ऑर्गनच्या १०० व्या शतकी महोत्सवाच्या महफिलचे कोथरूडमधील मयुर कॉलनीमधील बाल शिक्षण सभागृहात ही महफिल सादर केली . सुप्रसिध्द वादकांच्या जबरदस्त ऑर्केस्ट्रा आनेवाला या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात होऊन दिल चीज क्या , तुझे देखा तो ये जाना सनम , तू गंगा कि मौज मै , भोली सुरत , ये दुनिया उसीकी , आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे , लेकर हम दिवाना दिल , बाबू समझो इशारे , इना मीना डिका , रूप तेरा मस्ताना , इतना हो गयी , बार बार देखो अशी एका पाठोपाठ एक अशा २४ गाण्यांची समधुर बरसात झाली . रसिकांनी ६ गाण्यांना वन्समोअरची दाद देऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला .

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी नातू फाऊडेशनचे अध्यक्ष सारंग नातू , गार्डियन डेव्हलपर्सचे संचालक मनीष साबडे , मसुप्रसिध्द गायक जितेंद्र भुरुक , सुप्रसिध्द निवेदक आणि निर्माता संदीप पंचवाटकर , सुप्रसिध्द गायक शेखर गरुड , सुप्रसिध्द निवेदक अभय गोखले , शामकांत सुतार,   आदी मान्यवर उपस्थित होते .

   रशीद शेख (सिंथेसायझर )सचिन वाघमारे (बासरी )अनिल करमरकर (सेक्सोफोन ) अभिजित भदे (रिदम मशीन ऑक्टोपेड )पांडे (साईड रिदम ) अनिल देशपांडे (कोन्गोज ), किरण एकबोटे (तबला ढोलक ), विजू मूर्ती (बेस गिटार ), महेश गायकवाड (निवेदन ), समीर मोहिते (साउंड लाईट ) या सुप्रसिध्द वादकांच्या साथीने कार्य्क्रमची रंगत वाढली .

 या कार्यक्रमामध्ये अनिता कुदळे , अक्षय देशपांडे यांनी लेकर हम दिवाना दिल , संदीप कुमठेकर यांनी तू गंगा की मौज मै यमुना की धारा , प्रताप भसाळे यांनी किसीकी मुस्कुराहटो पे  उज्वला पिंगळे , मुकुंद परांजपे यांनी पहला नशा इतर कलाकरांनी ओमशांती ओम व इनामीना हि गाणी  माउथ ऑर्गनवर समूहाने गायली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...