कोथरुड विधानसभा मतदार संघातून नगरसेविका मेधाताई कुलकर्णी यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे, बुद्धिबळपटू कुंटे, माजी उपमहापौर बाळासाहेब मोकाटे, पालिकेतील गटनेते गणेश बिडकर, नगरसेविका माधुरीताई सह्स्र्बुध्ये, शहर सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते श्रीपाद ढेकणे, उपाध्यक्ष जयंत भावे, डॉ. संदीप बुटाला, महाराष्ट्र सोशल मिडिया सहसंयोजक मंदार घाटे मतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, महिला मोर्चा अध्यक्षा मंगला डेरे, कल्पना पुरंदरे, प्रशांत हरसुले, उल्का मोकासदार, त्रिगुण रेणावीकर, उदय कड, रितेश वैद्य, अजित जगताप यासह कोथरुड भागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळेला या मतदारसंघातील नागरिकांना प्रथमच कमळाला मतदान करण्याची संधी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साह असून त्याचा परिणाम मोठ्या मताधिक्याने विजयामध्ये रूपांतरित होईल असा विश्वास उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.