मेट्रो प्रकल्पाला गती द्या : राष्ट्रवादी शिष्ट मंडळाची व्यंकय्या नायडूंच्या भेटीत मागणी
पुणे :
‘पिंपरी चिंचवड चा स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा आणि पुणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी’, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिल्लीत शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार वंदना चव्हाण, पिंपरी चिंचवड मनपा महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघीरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे मनपा महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक अजित गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अमृत योजनेतुन पीएमपीएमएल ला 500 बसेससाठी अनुदान मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.