पुणे –
पुण्यातील एका मॅकडोनाल्ड रेस्टांरंटमधून एका रस्त्यावरील गरीब मुलाला हाकलून देण्याचा प्रकार पुढे आला आहे.यामुळे नागरिकत संताप पसरल्याचे चित्र सोशल मेडिया द्वारे दिसते आहे एका उच्चशिक्षीत महिला संबंधित गरीब मुलाला फैंटा फ्लोट पिण्यासाठी मॅकडोनाल्टमध्ये घेऊन गेली. मात्र, मॅकडोनाल्डमधील व्यवस्थापन व कर्मचा-यांनी त्या मुलाला बाहेर हाकलून लावले. दरम्यान, या घटनेमुळे वाद पेटला आहे. संबंधित महिलेने याबाबत सोशल मिडियावरून या घटनेची माहिती व फोटो शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला.दरम्यान, या घटनेने वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचली आहे
संबंधित महिलेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या काही मित्रांसमवेत मॅकडोनाल्डमध्ये गेली होती. त्यावेळी आम्ही कोक फ्लोट आर्डर केला होता. त्याचवेळी आमच्याजवळ एक रस्त्यावरील गरीब मुलगा येऊन उभा राहिला. त्यामुळे मी त्याला मुलाला पैसे देऊन आणखी एक कोक मागवला. मात्र, त्या मुलाला तेथे बसायला सांगितल्यानंतर तेथील कर्मचा-यांनी या मुलाला बाहेर जाण्यास सांगितले व हाकलून दिले. अशा लोकांसाठी ही जागा नाही असे त्या कर्मचा-याने सांगितले. त्यामुळे तो कोक आम्ही त्या मुलाला बाहेर प्यायला दिला.
दुसरीकडे मॅकडोनाल्ड इंडियाचे म्हणणे आहे की, या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. जर काही अशी घटना घडली असेल तर हा प्रकार सहन केला जाणार नाही. संबंधित कर्मचारी व व्यवस्थापकावर कारवाई केली जाईल.
मॅकडोनाल्डने पुढे म्हटले आहे की, आम्ही समानतेसोबत प्रत्येका सन्मान व आदर करतो. जेव्हा आम्ही समानता हा शब्द वापरतो तेव्हा कोणासोबतही भेदभाव करू शकत नाही. अनाथ, गरीब मुलाबाबत असा प्रकार घडला असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करू.