पुणे शहर कौमी तंजीमच्यावतीने आगामी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्यांक समाजासाठी ” अल्पसंख्यांक बांधवांची शक्ती , समानता आणि विकास ” या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .
पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या या चर्चासत्रात पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला , दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे अध्यक्ष शफी दिल्लीवाले , मौलाना हसन अशरफी ,असिफ पटेल , अस्लम बागवान , दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे संचालक अब्दुल रौफ चिंधीवाला , युसुफ बागवान , हाजी सईद भाई , छबील पटेल , अब्दुल सत्तार नदाफ , बशीर शेख , अफझल खान , नईम शेख मंडपवाले आदी मान्यवर आणि मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक संघटनाचे प्रतिंनिधी आणि कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला चर्चासत्रात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , समाजाचा विकास करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला संविधानाने संधी प्राप्त करून दिली आहे . आतापर्यंत मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्यासाठी वापर होताना दिसून येतो . परंतु आपले बहुमोल मताबाबत मुस्लिम समाजाने जागे राहिले पाहिजे . त्यासाठी इस्लामला समजावून घेतला पाहिजे . मुस्लिम समाजाचा विकास होणे गरजेचे आहे , परंतु आपल्यामध्ये सवांदाच्या अभाव असल्यामुळे समाज मागे पडत चालला आहे . राजकारणी मंडळी मुस्लिम समाजाला सत्तेचा वाटा का देत नाही , फक्त मुस्लिम मतांचा वापर होताना दिसत आहे . समाजाने सामाजिक न्यायाकडे वळले पाहिजे , तरच समाजाचा विकास साधला जाईल . मुस्लिम समाजाचा विकास साधणाऱ्याला आपले मत द्या असे आवाहन करण्यात आले .
यावेळी दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे अध्यक्ष शफी दिल्लीवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , मुस्लिम समाजाने जर ठरवले तर मुस्लिम समाजाचा आमदार होऊ शकतो . परंतु समाजातील व्यक्तीचे ऐकत नाहीत त्यामुळे मुस्लिम समाज सत्तेमध्ये मागे पडत चालला आहे . समाजातील प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी वेळ दिला पाहिजे समाजानेसुद्धा आपले पवित्र मतदानाचा हक्क बजावला पाहिजे . समाजाचा , शहराचा , राज्याचा , देशाचा विकास करणाऱ्याला काम करण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला, बशीर सय्यद , आरिफ मुल्ला , वाहिद वहाब शेख , अब्दुल रशीद चिंधीवाले , शाहीद पटेल , बशीर ताजमत आदींनी केले होते .