(पहा ट्रेलर लाँच समयीची छायाचित्रे )
आपली मुलगी सोनम हिने अभिनेत्री व्हावे अशी अभिनेता अनिल कपूरची मुळीच इछ्या नव्हती असा गौप्य स्फोट प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांनी केला आहे .
मुंबईत आगामी ‘नीरजा’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. . फ्लाइट अटेंडंट नीरजा भनोटच्या रिअल लाइफ स्टोरीवर हा सिनेमा आधारित असून ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्री सोनमकपूर दिग्दर्शक राम माधवानी, शबाना आझमी आणि भनोटचे नातेवाईक या कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी शबाना आझमी म्हणाल्या ,’सोनम लहान असताना तिचे वडील अनिल यांनी तिला माझ्याकडे पाठवले होते. सोनमने अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू नये, हे मी तिला समजावून सांगावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यावेळी सोनमला मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोनम जेव्हा माझ्याकडे आली आणि मला सांगितले, की तिला अभिनेत्री व्हायचे आहे, तेव्हा मात्र मी तिला न रोखता , मी तिला पाठिंबा दिला. आता या सिनेमात ही मी तिच्या आईचीच भूमिका करते आहे त्यामुळे खरोखर तिला ही या गोष्टीचा विशेष आंनद होता .
सोनमने यावेळी सांगितले, ” या सिनेमाने मला सकारात्मक जीवनाची दिशा दिली , या सिनेमाचा हा प्रवास खरोखर खूपच भावनिक असाच होता आणि त्यामुळे तो माझ्यासाठी खूप अवघड ठरला. सिनेमाने मला पॉझिटिव्ह बनवले.